Women protest in Maharashtra over cancelled Ladki Bahin scheme applications, as over 80,000 beneficiaries are dropped.  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: ८० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द; महिलांमध्ये संतापाची लाट|VIDEO

80,000 Applications Cancelled in ‘Ladki Bahin Yojana': लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, राज्य सरकारनं जवळपास 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्य सरकारनं जवळपास 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेत. त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणारेय. त्यांना मोठा फटका बसलाय. तर दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचं पोर्टलही बंद करण्यात आलंय. त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.

यावर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गरज सरो वैद्य मरो ही सरकारची भूमिका आहे. लाडक्या बहीणींना दीड हजारवरून 2100 रुपये देणार अशी घोषणा करुन मतांचा डल्ला मारणार जे सरकार आहे त्या सरकारने पैसे तर वाढवलेच नाही मात्र ज्यांना काही हफ्ते मिळाले त्यातही मोठ्या संख्येवर लाडक्या बहीणींची संख्या कमी केली आणि त्यामध्ये आता नव्याने कोणाचाही समावेश करत नाही. लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy CM Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार सक्रिय;'या' जिल्ह्याचा करणार दौरा

Diamond Mangalsutra: डायमंड मंगळसूत्र घेताय? मग या 6 लेटेस्ट डिझाईन एकदा पाहाच

विमान अपघातातील सहावी व्यक्ती कुठे? ऐनवेळी पायलट का बदलला? अजित दादांचा घातपात? दोन बड्या नेत्यांना दाट शंका|VIDEO

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

अर्थसंकल्पात दारू महागली, तरुणाई दु:खात बुडाली; भाववाढीवर कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT