Maharashtra Politics eknath shinde devendra fadnavis  Saam TV
Video

Maharashtra Politics : सरकार लवकरच कोसळणार, कुणी केला दावा? कारणही सांगितले; पाहा व्हिडीओ

Maharashtra political crisis : महायुती सरकार लवकरच कोसळेल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महायुतीतील अंतर्गत वाद, असंतोष, शेतकऱ्यांचे प्रश्न, अर्थव्यवस्था आणि सरकारी योजनांवर त्यांनी भाष्य केले. नेमकं काय म्हणाले थोरात?

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. महायुतीचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महायुतीमध्ये अंतर्गत मोठे वाद, अस्वस्थता आणि असंतोष असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या समोर येणारे आरोप-प्रत्यारोप हे महायुतीमधील अंतर्गत खळबळीचा केवळ एक टक्का भाग असल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. एकमेकांवरील अविश्वासाचे परिणाम लवकरच दिसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील अस्वस्थता थोड्या प्रमाणात उघड झाली असली, तरी पक्षांतर्गत मोठा कलह सुरू आहे. हे सरकार लवकरच पडेल, असा दावा माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सध्या राज्यात महायुतीमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप उघड झाले असून, अंतर्गत प्रचंड खळबळ माजली आहे. महायुतीमध्ये प्रचंड वाद, अस्वस्थता आणि असंतोष पसरला आहे. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे; त्यातच दुष्काळ, शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी मदत, शेतमजुरांकडे झालेले दुर्लक्ष, फसलेल्या योजना आणि भ्रष्टाचार यामुळे हे सरकार येत्या काळात आपोआपच पडेल, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार दुष्काळी अरण गावाला आज भेट देणार

तेव्हा तुम्ही पाकिस्तानला लव्ह लेटर लिहायचे; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात|VIDEO

२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

Crime: मित्रांकडून डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नंतर...

Relationship Tips : जर तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करत असेल, तर मिळतात 'हे' ७ संकेत

SCROLL FOR NEXT