Government Officer Want be PA Ht
Video

Maharashtra News: डिपार्टमेंट नको, साहेब पीए करा; अधिकाऱ्यांची मंत्रालयात बदलीसाठी तोबा गर्दी

Government Officer Want be PA: मंत्रालय म्हटलं की सामान्यांची भाऊगर्दी मात्र सध्या मंत्रालयात गर्दी आहे ती अधिकाऱ्यांचीच. कशामुळे राज्यभरातले अधिकारी मंत्रालयाचे खेटे घालतायत? नेमकं काय हवंय या अधिकाऱ्यांना? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

नव्या मंत्र्यांसोबत काम करण्यासाठी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय. कारण मंत्र्याकडे वजनदार फाईली येत असतात आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचंही वजन वाढतं.हे चांगलंच ठाऊक असल्यामुळेच आपला मूळ विभाग सोडण्यासाठी अधिकारी नवे नवे फंडे वापरत आहेत.

कॅबिनेट मंत्र्यांकडे पीए, पीएस, ओएसडी मिळून १५ तर राज्यमंत्र्यांकडे १३ जण असतील असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे. उसनवारीवर घ्यावयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे उसनवारीवर किती अधिकाऱ्यांना घ्यायचे याचे बंधन मंत्री कार्यालयावर नाही. याचा फायदा घेत अनेकांना उसनवारीवर घेतले जातंय. एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ५० अधिकाऱ्यांना उसनवारीवर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रालयातीलच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांमध्येही मंत्र्यांचा पीए होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. एकेका मंत्र्याकडे तब्बल १०-१० अधिकाऱ्यांचे अर्ज आले आहेत.

या अधिकाऱ्यांना मंत्र्याकडे बदली झाल्यानंतरही आपल्या मूळ विभागात असलेलाच पगार आणि भत्ते मिळतात. मात्रमंत्र्यांकडील टेबलाखालच्या कमाईचा हिशोब न विचारलेलाच बरा आणि त्यामुळेच मंत्रीसाहेबांचा पीए होण्यात सर्वांना अधिक रस आहे.सुट-बूट तर सर्वच अधिकाऱ्यांकडे असतात...मात्र सर्वात मोठा वट असतो तो मंत्रीसाहेबांच्या पीएचाच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

Shirdi : दहीहंडीच्या मिरवणुकीत हत्येचा थरार, जुन्या वादातून मित्रांकडून १८ वर्षीय तरुणाची हत्या

Elvish Yadav House Firing: धावत धावत आले अन् धाड धाड धाड झाडल्या दोन डझनभर गोळ्या, गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

SCROLL FOR NEXT