Nandurbar news  Saam Tv
Video

Nandurabar News: कोसळणाऱ्या छताखाली शिक्षणाची लढाई, नंदुरबार येथील विद्येच्या मंदिराची दयनीय अवस्था, VIDEO

ZP school condition: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यात सीबीएसई बोर्ड लागू होणार असल्याची घोषणा केली. मात्र नवीन शिक्षण प्रणाली आणण्यापूर्वी आधीच दयनीय स्थितीत असलेल्या शाळांची सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करणार का? असा प्रश्न हि बातमी बघून नागरिक विचारत आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या भिंतींना भेगा पडल्या असून छताला लाकडाचा आधार देऊन ते कसेबसे टिकवले जात आहे. मात्र शाळा निर्लेखित झाल्यानंतरही उपाययोजना होत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

या शाळेत 288 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एकूण 7 खोल्यांपैकी 5 खोल्या पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवाच्या भीतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या भिंती व छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. पालकांनी वारंवार शासन व प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT