Maharashtra Freedom of Religion Act saam tv
Video

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra Dharma Swatantrya kayda : येत्या २८ ऑगस्ट २०२६ पासून म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवसापासून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ लागू होणार आहे. सरकारने याबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

Ganesh Kavade

सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात दोषींना सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असलेला महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ राज्यात २८ ऑगस्ट २०२६ म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवसापासून लागू होणार आहे. राजपत्रात यासंबंधीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

येत्या रक्षाबंधनपासून राज्यात लागू होणाऱ्या धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार, व्यक्तीला जबरदस्तीने किंवा फसवणूक करून, अथवा दबाव टाकून धर्मांतर करण्यास भाग पाडणे गुन्हा ठरणार आहे. सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. अलीकडेच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६ मंजूर झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कायद्याला मंजुरी मिळाली होती. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT