Black Panther 
Video

Black Panther : गुहागरमध्ये आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर; 'बघीरा'चा व्हिडिओ व्हायरल

Black Panther : हा ब्लॅक पँथर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

Namdeo Kumbhar

Black Panther Spotted In Guhagar : रत्नागिरीतील गुहागरमध्ये पिंपर गावच्या परिसरात ब्लॅक पँथर आढळून आला. हा ब्लॅक पँथर जंगलाच्या दिशेने जात असताना काही नागरिकांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला. ब्लॅक पँथर हा तसा लाजाळू आणि निशाचर असल्याचे म्हटले जाते, गुहागर तालुक्यात अनेकदा ब्लॅक पँथरचे दर्शन होत असते. पिंपळमध्ये आढळून आलेला हा ब्लॅक पँथर बराच वेळ एकाच जागेवरती बसून राहिल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. वाघाच्या प्रजातीमधील ही जात असल्याचे देखील म्हटले जाते. पावसाळ्यात कोकणातील जंगले घनदाट होत असतात आणि यामुळे अनेक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन पावसाळ्यात लोकांना होत असते. पिंपळ मार्गावरून जाणाऱ्या जंगली भागातून रस्त्यावरून अनेकदा अशा प्रकारचे प्राणी नजरेस येत असल्याचे देखील बोलले जात आहे. ब्लॅक पँथर अर्थात बगीरा याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT