Maharashtra Paneer Ban साम टीव्ही मराठी
Video

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Paneer Ban : महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एनालॉग (कृत्रिम) पनीरवर एक वर्षाची बंदी लागू केली आहे. एफडीएच्या आदेशानुसार अशा पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Bans Analog and Artificial Paneer : महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट पनीरविरोधात राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात आता एनालॉग (Analog) आणि आर्टिफिशिअल (कृत्रिम) पनीरवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) जारी करण्यात आला आहे.

ही बंदी पुढील १ वर्षाच्या कालावधीसाठी लागू असणार आहे. या काळात राज्यात अशा प्रकारच्या कृत्रिम किंवा बनावट पनीरचे उत्पादन करणे, साठवणूक करणे, वितरण करणे किंवा विक्री करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा मानला जाईल. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वनस्पती तेल, स्टार्च आणि रसायनांचा वापर करून तयार केले जाणारे हे कृत्रिम पनीर आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आमदारांनी विधानसभेत या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत अशा बनावट पनीरवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT