Maharashtra Election:  Saam tv
Video

Maharashtra Election: लाडक्या बहिणींचे भाऊ कोट्यधीश; कोणत्या नेत्याची किती संपत्ती? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Political news : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. यातून अनेक सर्वच पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यासाठी काहीजण मुहूर्तही शोधत आहेत. मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता आहे, ती म्हणजे प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवारांची संपत्ती किती आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे. हे कळतं. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. पाच वेळा निवडणूक जिंकणाऱ्या लोढा यांची संपत्ती 400 कोटींच्यावरती आहे.

आपण काही उमेदवारांच्या संपत्तीवर नजर टाकूया..

मंगलप्रभात लोढा, भाजप - 436 कोटी 80 लाख

राधाकृष्ण विखे पाटील, भाजप- 24 कोटी 10 लाख 21 हजार

शिवाजी कर्डिले, भाजप- 15 कोटी 86 लाख 12 हजार

छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- 11 कोटी 20 लाख 41 हजार

धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- 53.80 कोटी

दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - 52 लाख 16 हजार

नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- 2 कोटी 90 लाख

आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरे गट - 21 कोटी

यशोमती ठाकूर, काँग्रेस - 9 कोटी 1 लाख 92 हजार

ऋतुराज पाटील, काँग्रेस - 48 कोटी 48 लाख

राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास २८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर पत्नीच्या नावे ८५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

राज्यात गरजूंसाठी असलेली लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली आहे. मात्र सत्ताधारी पक्षाचे अनेक उमेदवार श्रीमंत असल्याचं समोर आलंय. हे श्रीमंत उमेदवार मतदाराचं मन जिंकणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT