Mahant Shivaji Maharaj addressing media at Narayangad; makes explosive revelations about mismanagement and corruption in the Trust. Saam Tv
Video

Beed Narayangad: महंत शिवाजी महाराजांचा नारायणगडाच्या ट्रस्टींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप|VIDEO

Narayangad Trustee Corruption: महंत शिवाजी महाराजांनी नारायणगड ट्रस्टवर हल्लाबोल करत ट्रस्टमधील काही सदस्यांवर निधी गैरवापर, जमिनींची विक्री व ऑडिट न करण्याचे गंभीर आरोप केले.

Omkar Sonawane

नारायणगडावर उत्तराधिकारी निवडीवरून सुरू असलेल्या वादावर आज महंत शिवाजी महाराजांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. परंपरा, भक्ती, निधी आणि गडाच्या विकासावर बोलताना त्यांनी नारायणगड ट्रस्टमधील काही ट्रस्टींवर गंभीर आरोप केले.

महंत शिवाजी महाराज म्हणाले की, नारायणगड ही तपोभूमी आहे. महादेव बाबांच्या पुण्यतिथी निमित्त दर्शनासाठी आलो. मात्र गडाची बदनामी ट्रस्टी करत आहेत, भक्त नव्हे. ते पुढे म्हणाले की, आम्ही नेमलेले ट्रस्टी आरोप करत आहेत, कोर्टात गेले, जमिनी विकल्या आणि सह्या स्वत: ट्रस्टींच्याच आहेत. पैसे कोणी नेले ते स्पष्ट आहे. त्यांनी असंही उघड केलं की, मेटे साहेबांनी आणलेल्या २५ कोटी निधीमुळेच ही कुरघोडी सुरू झाली. गडाची बदनामी होत आहे म्हणूनच मला आज बोलावं लागलं, असं सांगताना त्यांनी ट्रस्टी बळीराम गवते व सी. ए. जाधव यांच्यावर पाच वर्षांचे ऑडिट न केल्याचा आरोप केला. पुतळ्यासाठी गोळा केलेली वर्गणी गवतेंनी खर्च केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.

महंत शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलं की, उत्तराधिकारी निवडीला कोणाचाही विरोध नाही. ट्रस्टींच्या सह्या आहेत. मात्र आपल्या मनातील राग काढण्यासाठी ही वादग्रस्त भूमिका घेतली जात आहे. भक्तांच्या सहभागातून गडाच्या विकासाची कृती समिती तयार केली जाणार असून, प्रत्येक गावातील दोन तरुणांची समिती गडासाठी कार्यरत राहील, असंही त्यांनी सांगितलं. नारायणगडासाठी मी प्राण द्यायला तयार आहे, असं भावनिक वक्तव्य करत त्यांनी ट्रस्टवरील अविश्वास ठामपणे मांडला. शेवटी ते म्हणाले, ट्रस्टी हा माळकरी असला पाहिजे. गड कोणाच्या बापाचा नाही तो भक्तांचा आहे. कोर्टात आमची चौकशी करावी अशी विनंतीही आम्ही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

महिलांशी अश्लील संभाषण करतानाचा ऑडिओ लीक, World Cup जिंकवून देणाऱ्या कर्णधाराला संघातून हाकललं

Maharashtra Live News Update: सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या प्रयत्न विरोधात भीम आर्मीचा मोर्चा..

Mumbai To Ram Mandir Travel: जय श्री राम! मुंबईवरून राम मंदिर कसे पोहोचावे? जाणून घ्या सर्वौत्तम मार्ग

आईला पाहायला बाल्कनीत गेली, ७व्या मजल्यावरून खाली पडली, ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT