Mohan Yadav helicopter incident latest update Saam
Video

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, काय झालं नेमकं?, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Mohan Yadav helicopter incident latest update : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी दुर्घटना टळली. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री सुरक्षित असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Madhya Pradesh CM Mohan Yadav : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी एक धक्कादायक घटना घडली. खंडवा दौऱ्यावरून परत येत असताना मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यावर अचानक पुढे जाण्याऐवजी मागे सरकू लागले आणि एका बाजूला झुकले. हा प्रकार पाहून उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. सुदैवाने पायलटच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Madhya Pradesh CM helicopter technical problem)

मुख्यमंत्री मोहन यादव 'लाडली बहना' योजनेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने परत निघाले. पण उड्डाण घेताच हेलिकॉप्टर तांत्रिक कारणास्तव किंवा हवेच्या दबावामुळे सरळ जाण्याऐवजी उलट्या दिशेने आणि तिरपे होऊ लागले. हेलिकॉप्टर जमिनीच्या दिशेने झुकल्याचे पाहून उपस्थित असणारे प्रचंड घाबरले होते. पण पायलटच्या प्रसंगावधानमुळे दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT