भोंगा मुद्दा महाराष्ट्र राजकारण Saam Tv
Video

Maharashtra Assembly: राज्यात भोंग्यांचा मुद्दा पुन्हा पेटला, मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर निर्देश, VIDEO

Loudspeaker Controversy: राज्यात भोंग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवा अन्यथा तितक्याच आवाजाने हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा दिला होता.

Omkar Sonawane

आता पुन्हा नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत भोंग्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला.त्या म्हणाल्या, राज्यात असलेले भोंगे यावर मी लक्ष वेढत आहे.भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही.यामुळे ध्वनी प्रदूषण होते.मी या आधीही भोंगे बंद करण्यासाठी पत्र दिले होते. पण उद्धव ठाकरे सरकारने तेव्हा यावर काहीच कारवाई केली नाही.उत्तरप्रदेश सरकारने बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई केली होती.महाराष्ट्र सरकार भोंगे बंद करणार का? आणि उद्यापासूनच भोंगे बंद होतील का? असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना सांगितले,धार्मिक स्थळावरील भोंगे रात्री 10 वाजल्यापासून तर सकाळी 6 पर्यंत बंद असले पाहिजे.भोंग्याची वेळ आता सकाळी 6 ते 10 इतकीच राहील आणि त्यावरही आवाजाही मर्यादा असणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. दिवसा भोंग्याचा आवाज हा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल इतका असला पाहिजे.असे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले असून हि सर्व जबाबदारी आता स्थानिक पीआयची असणार आहे. कुठेही नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावर करवाई केली जाईल असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

SCROLL FOR NEXT