डिलिमिटेशननंतर लोकसभेतील खासदारांची संख्या ५४३ वरून ८१६ होण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ८१६ जागांचा संभाव्य नकाशा सादर केला असून त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे ५० टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर प्रदेशातील जागा ८० वरून १२०, तर महाराष्ट्रातील जागा ४८ वरून ७२ होण्याचा अंदाज आहे.
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या विधेयकाला इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी विरोध केला आहे. तर शरद पवार आणि एम के स्टॅलिन यांचा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील जागा ५४३ वरून थेट ८१६ वर जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.