Women in Shirur’s Pimparkhed village wear spiked neck collars while working in fields to protect themselves from leopard attacks. Saam Tv
Video

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

Leopard Terror Continues In Pune Shirur Village: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरखेड गावातील महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालण्याची अनोखी शक्कल लढवली आहे.

Omkar Sonawane

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे मागच्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेल्यानंतर शेतात काम करणाऱ्या महिलांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घातले आहेत. उत्तर पुणे जिल्हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय. बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं. ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी हि अनोखी शक्कल लढवलीय. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले असून, पिंपळखेड गावातील महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी एक धक्कादायक उपाय शोधला आहे. 'आम्ही शेतात मोकळं जाऊ शकत नाही, आमच्या मानेवर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे या पट्ट्यांची गरज आहे,' असं एका स्थानिक महिलेने म्हटलं आहे. बिबट्या थेट मानेवर हल्ला करतो, त्यामुळे शेतात काम करताना गवत कापणे किंवा इतर कामे सुरक्षितपणे करता यावीत यासाठी या महिलांनी टोकदार खिळे असलेले पट्टे गळ्यात घालण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT