Dhanaji Sakhalkar announces ₹1.11 lakh reward for anyone who slaps Laxman Hake with a Kolhapuri chappal. Saam Tv
Video

लक्ष्मण हाकेंचं कोल्हापुरी चप्पलीने तोंड झोडा अन् 1 लाख रुपयांचे बक्षीस जिंका या नेत्यानी केली घोषणा|VIDEO

₹1 Lakh Reward For Slapping Laxman Hake With Kolhapuri Chappal: लक्ष्मण हाकेंवर कोल्हापुरी चप्पल हल्ला करणाऱ्यास 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावरून मराठा-ओबीसी वाद चिघळला.

धनाजी साखळकर यांनी चप्पल हल्ल्यासाठी ₹1.11 लाख बक्षीस जाहीर केले.

लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल होऊन वाद पेटला.

सोलापूरमध्ये फिरले तर चप्पलांचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी एल्गार पुकारला असून 20 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोठ्या संख्येने रवाना होणार आहे. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसीची संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. यावरून जरांगे समर्थक आक्रमक झाले आहेत.

लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, 'काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसीच नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे, हे त्यांच्या पोटात दुखतंय. या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता जरांगे समर्थक धनाजी साखळकर यांनी लक्ष्मण हाकेवर टीका केली आहे. जो कोणी कोल्हापुरी चपलेने लक्ष्मण हाकेच्या कानाखाली मारेन आणि त्यांना चपलेचा हार घालेन त्याला एक लाख अकरा हजार रुपायांच बक्षीस मी जाहीर करतो तसेच लक्ष्मण हाके हे जर सोलापूरमध्ये फिरकले तर ओबीसी, मराठा आणि दलित समाजाकडून त्यांना चपलेचा हार घातला जाईल असा इशारा साखळकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Crime: तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली, आधी आई-वडील अन् भावाची हत्या, नंतर मेट्रो स्टेशनवर गेला अन्...

Beed Crime: होमगार्ड महिलेला संपवलं, मैत्रिणीचा खरा चेहरा जगासमोर, शेवटच्या त्या व्हिडिओमुळं झाला पर्दाफाश

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर मुंबईतील सराफा व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर लुटलं

Whatsapp Hack Video: तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकतं? तुमच्या फोटो, मेसेजची चोरी होतेय?

SCROLL FOR NEXT