Ladki Bahin Yojana SaamTv
Video

Ladki Bahin Yojana News : अपात्र लाडक्या बहिणींना सोडवेना लाभ | Video

Disqualified Women's In Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसलेल्या महिलांनी लाभ सोडवा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. मात्र अपात्र लाडक्या बहीणी लाभ सोडण्यास इच्छुक नसल्याचं बघायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरून देखील अनेक महिला लाभ सोडताना दिसत नाही आहेत. अपात्र महिलांनी लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील महिला लाभ सोडण्यासाठी फारशा इच्छुक दिसत नसल्याचं बघायला मिळत आहे. फक्त एकाच महिले पुढे येत आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्याचं कळवलं आहे.

महायुती सरकारने आता लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या बहीणींवर कारवाई करण्याचं ठरवल्यानंतर अनेक अर्ज छाननी करून बाद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने अपात्र लाडक्या बहिणींना स्वत:हून पुढे येत लाभ सोडण्याची मागणी केली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ सोडवत नसल्याचं सध्या दिसत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने जारी केलेल्या निकषात महिलेचं वय १८ ते ६५ वर्षादरम्यान असावं, कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं, घरातलं कोणीही सरकारी नोकरीत किंवा इन्कम टॅक्स भरणारं नसावं, संजय गांधी निराधारसारख्या इतर योजनांचं लाभार्थी नसावं, तसंच घरात चारचाकी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील, अशा अटी टाकण्यात आलेल्या आहे. या निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला मात्र आता लाभ सोडत नसल्याचं चित्र पुणे जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT