Kurla Chunabhatti SaamTv
Video

VIDEO : कुर्ला, चुनाभट्टीमध्ये भाजपला धक्का; 1 हजार कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Kurla - Chunabhatti Constituency News : विधानसभा निवडणुकीत भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली असून कुर्ला चुनाभट्टी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Saam Tv

कुर्ला आणि चुनाभट्टी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 1 हजार कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. सगळ्या पक्षात इनकमिंग आऊट गोइंग सुरू आहेत. त्यातच आता भाजपच्या एक हजार कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आज प्रवेश केल्याने भाजपला एन विधानसभेत हा मोठा धक्का बसला आहे. कुर्ला आणि चुनाभट्टी येथील हे कार्यकर्ते असून या भागातून आता भाजपला नवीन आवाहन समोर आले आहे. कुर्ला विधानसभेतील भाजपचे महामंत्र्यांसोबत हे एक हजार कार्यकर्ते ठाकरे गटात जात आहे. या एक हजार कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीत हे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

Maharashtra News Live Updates: खडकवासलामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

Dana Cyclone Alert : 'दाना' चक्रीवादळ उडवणार दाणादाण! २ राज्यांत शाळा-कॉलेज बंद, रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT