Scene from Shriram Nagar pan stall after the Koyta Gang attack – destruction caught on CCTV Saam tv
Video

Pune News: पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; धारधार शस्त्राने पानटपरीवर हल्ला|VIDEO

Koyta Gang Attacks Pan Stall In Pune Shriram Nagar At Midnight: पुण्यातील श्रीराम नगर भागात कोयता गँगने पानटपरीवर अचानक हल्ला करत मोठी तोडफोड केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील हवेली तालुक्यातील श्रीराम नगर भागात कोयता गँगने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १० जुलै रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही इसमांनी धारदार कोयत्याने एक पानटपरीवर अचानक हल्ला चढवला. टपरीमधील साहित्याची तोडफोड करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ही संपूर्ण घटना टपरीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत कोणतीही तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही. स्थानिकांनी खेड शिवापूर पोलिसांना माहिती दिली असूनही पोलिसांनी स्वतःहून कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

SCROLL FOR NEXT