Khed Jagbudi River Video Saam TV
Video

Konkan Rain Updates : खेडमध्ये मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, महापुराचा VIDEO

Jagbudi River Video : खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

Satish Daud

रत्नागिरी : मुंबईसह कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. खेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.

या महापुराचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. शनिवार आणि रविवारी पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खेड मटण मार्केटमधे पुराचं पाणी शिरलं आहे. पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे नगर परिषद कडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जगबुडी नदीसोबतच नारंगी नदीला देखील पूर आला आहे. पुराचं पाणी रस्त्यावर येत असल्याने खेड-दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन तासांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT