Kokan Railway Saam Tv
Video

Ganeshotsav Kokan Railway : मुंबईकरांसाठी दिलासा की गैरसोय? कोकण रेल्वेची गणेशोत्सव रो-रो सेवा एक दिवसाआड धावणार

Kokan Railway Ro-Ro Service : गणेशोत्सवात महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोकण रेल्वेने कोलाडहून गोव्याला रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्टपासून सुरू होणारी ही सेवा एक दिवसाआड धावेल.

Alisha Khedekar

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोकण रेल्वेने यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेअंतर्गत एकावेळी ४० कार रेल्वेतून नेल्या जाणार असून २३ ऑगस्टपासून ही सेवा एक दिवसाआड सुरू राहणार आहे. गाडीला कोकणात नांदगाव रोड येथे एकमेव थांबा असून पुढे गोव्यात वेरणा हा दुसरा थांबा असेल. रत्नागिरी जिल्ह्यात या सेवेला कोणताही थांबा नसल्याने अनेक चाकरमान्यांना अपेक्षित सोय मिळणार नाही. या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांना अडीच तासांचा प्रवास करून कोलाडला यावं लागणार आहे. त्यातच १६ गाड्यांचे बुकिंग पूर्ण न झाल्यास फेरी रद्द करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आयत्यावेळी फेरी रद्द झाल्यास काय करायचे, हा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. या सर्व अटींमुळे या सेवेचा प्रत्यक्षात किती फायदा होईल, याबाबत चाकरमानी साशंक आहेत. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाने महामार्गावरील प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी ही सेवा सुरू केल्याचे सांगितले असून, इच्छुकांनी लवकर बुकिंग करावे, असे आवाहन केले आहे.n

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT