Sharad Pawar SaamTv
Video

Sharad Pawar : मी वाट बघतोय कोण कोण कधी जातंय, शरद पवारांची उदय सामंतांवर टीका | Video

Sharad Pawar Press Conference : कोल्हापूर येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

Saam Tv

उदय सामंत वारंवार सांगत आहेत, हे संपर्कात आहेत ते संपर्कात आहेत. मी वाट बघतोय कोण कोण कधी जातंय, अशी मिश्किल टीका शरद पवार यांनी केली आहे. आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री उदय सामंत हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सतत बोलत असल्याने त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा खूप टोकाची टीका करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यावर टोकाची टीका करत असतील. अमित शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार असतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरे सतत सांगत आहेत, की भाजपचे हिंदुत्व खरं नाही. उद्धव ठाकरे यांच्या सभेला काल गर्दी जास्त होती हे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. त्यांनी स्वबळाबाबत चर्चा केली. पण त्यांची टोकाची भूमिका दिसली नाही. राजकीय पक्षाचे ते प्रमुख आहेत. आपला पक्ष वाढवण्याच्या दिशेनं त्यांची पावलं पडत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे वाटेल ते त्याग करतील पण विचार कधी सोडणार नाहीत, असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, काल पुण्यातील कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी शरद पवारांची त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली होती. १० मिनिट झालेल्या या भेटीत दोघे काका पुतण्याच केबिनमध्ये होते. त्यावर देखील शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल कार्यक्रमात आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एका प्रकल्पाबद्दल ते बोलायला आले होते. काल अजित पवार यांची खुर्ची बदलली कारण नवीन सहकार मंत्री आहेत त्यांना माझ्याशी बोलायचं होतं, मीच म्हटलं मग माझ्या बाजूला बसा, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT