Kolhapur Saam TV
Video

Kolhapur : कोल्हापुरात पंचगंगा नदीचा रौद्रावतार, वाहतुकीचे १२ मार्ग बंद | VIDEO

Flood Alert in Kolhapur : पंचगंगा नदीची पाणीपातळी ३५ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा वेदगंगा, घटप्रभा, भोगावती, ताम्रपर्णी सह जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापुरात जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३५ फुटांवर पोहोचली असून, ती इशारा पातळीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जोरदार पावसामुळे १२ मार्गांवरील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. ५९ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असली तरी, पर्यायी मार्गांद्वारे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

राधानगरीसह १६ धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठा झाला असून, यामुळे राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक तर दूधगंगा धरणातून १६०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सध्या पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून, धोका पातळी ४३ फूट आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा असून, भविष्यातील पावसाचा अंदाज लक्षात घेता विसर्ग सुरुच ठेवण्यात येत आहे.

पावसाच्या जोरामुळे आतापर्यंत ३९ घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे. पंचगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, वारणा, वेदगंगा, घटप्रभा, भोगावती आणि ताम्रपर्णी या नद्या पात्राबाहेर वाहत आहेत.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरजन्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मधुमेहाच्या रूग्णांनी 'ही' फळं खावीत; शुगर वाढण्याची समस्या येणार नाही

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

कफन चोरांचा सरदार म्हणू का? उद्धव ठाकरेंचा वार, फडणवीसांचा प्रहार | VIDEO

Suranache Kaap Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत सुरणाचे काप

Maharashtra Politics : मराठीच्या मुद्द्यानंतर आता मनसेचा थेट बीएमसीवर हल्लाबोल; पक्षातील नेत्यांचा थेट 'खळखट्याक'चा इशारा

SCROLL FOR NEXT