कोल्हापूर: मोबाईलवर गेम खेळण्याची हौस किती महागात पडू शकते, याचं एक धक्कादायक उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात समोर आलं आहे. एका शेतकऱ्याने आपल्या सहावीतील मुलाला मोबाईल गेमसाठी फोन दिला आणि त्यातून थेट बँकेतील ५ लाख रुपये गायब झाले.
शेतकऱ्याने म्हैस खरेदीसाठी आपल्या खात्यात ७ लाख रुपये साठवले होते. मात्र, ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमच्या नादात मुलाकडून सततचे ट्रान्झेक्शन्स झाले. यामध्ये ५ लाख रुपये खर्च झाल्याचे उघडकीस आले आहे.
शेतकऱ्याच्या मोबाईलवर सतत येणाऱ्या बँक ट्रान्झेक्शनच्या मेसेजमधील माहितीच्या आधारे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी तपास करताना ट्रान्झेक्शन आयडीच्या मदतीने गुन्ह्याचा उलगडा केला. ही संपूर्ण रक्कम गेममध्ये विविध वस्तू खरेदी आणि इन-गेम पॉइंट्ससाठी वापरल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आणि पालकांनी मुलांना मोबाईल देताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये बँक अॅप्स, यूपीआय किंवा अन्य आर्थिक व्यवहारांची अॅक्सेस असल्यास ते सुरक्षित ठेवण्यावर भर देण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.