kolhapur  Saam tv
Video

Kolhapur Crime : कोयत्याला धार,कोल्हापुरात गँगचे रिलस्टार; धारदार शस्त्रासह रिल,नंतर तरुणाचा गेम, VIDEO

Kolhapur Crime News : कोल्हापूर शहर आणि परिसरात गुंडांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे... निरपराध तरुणांची हत्या करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहेत. स्टेटस वर चिथावणीखोर रिल्स लावून एका तरुणाची हत्या करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेलेली आहे. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हातबल झाल्याचे दिसून येत आहे.... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट.....

Tanmay Tillu

डॉन,दहशत,दादा,भाई अन् काय काय बिरुदावल्या लावून दहशत माजवणाऱ्या क्षुल्लक गुंडांची ही रिलगिरी...गुंड म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी हे अल्पवयीन तरुण सध्या रिल्सचा आधार घेतात. असाच धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडलायं...त्यामुळे कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 6 ते 7 तरूणांनी आधी कोयता घेऊन चिथावणी खोर रिल्स तयार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच तरूणांनी एकाची निर्घृण हत्या केली. विठ्ठल शिंदे असं मृत तरूणाचं नाव असून, 10 जानेवारीला त्याच्यावर हल्ला करण्यात आला.ही घटना कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात घडली.

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसर कोयता गॅंगसाठी कुप्रसिद्ध असताना आता राज्यातील विविध शहरातून अशा कोयता गँग सक्रिय होतायत...कोल्हापुरात तरुण आणि काही अल्पवयीन मुलांनी कोयता घेऊन हैदोस माजवलाय.. बी के ग्रुप असं कोयता गँगचं नाव असून, यात 5 तरूण आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ..याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तातडीने 7 आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं. 7 आरोपींपैकी 2 आरोपी अल्पवयीन असून, 5 आरोपी 21 ते 23 या वयोगटातील आहेत. कोल्हापुरात एका बाजूला आरोपींना दुग्धाभिषेक घातला जातोय. तर दुसरीकडे आरोपी वेगवेगळे रिल्स ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत.. या सर्व प्रकारावरून कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT