Kedarnath-bound helicopter crashes near Gaurikund, killing all seven onboard. Among the victims were three family members from Yavatmal, Maharashtra, including a two-year-old girl. Saam TV News
Video

Helicopter Crash : देवदर्शनाआधीच काळाचा घाला, हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळमधील तिघांचा मृत्यू | VIDEO

Kedarnath helicopter crash kills family from Yavatmal : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर क्रॅश; यवतमाळमधील राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा आणि २ वर्षांची मुलगी काशी यांचा मृत्यू. हवामान बिघडल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज.

Namdeo Kumbhar

अहमदाबादमधील विमान अपघात ताजा असतानाच केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे केदारनाथ धामला जात असताना गौरीगुंड आणि त्रिजुगीनारायण यादरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्देवी घटनेत महाराष्ट्रातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन वर्षाच्या काशीचाही समावेश आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ धाम येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळमधील वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी राजकुमार जयस्वाल अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. १२ जून रोजी राजकुमार जयस्वार हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीसोबत वणी इथून केदारनाथसाठी गेले होते. पण देवदर्शन करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT