Villagers catch two men red-handed performing black magic rituals at night in Karjat’s Halivali cremation ground  Saam tv
Video

कर्जतच्या हालीवली गावात जादूटोण्याचा थरार, दोघांना पकडले अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

Black Magic Rituals: कर्जतच्या हालीवली गावातील स्मशानभूमीत अघोरी विधी करणाऱ्या दोन संशयितांना गावकऱ्यांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे.

Omkar Sonawane

कर्जत तालुक्यातील हालीवली गावातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गावातील स्मशानभूमीत जादूटोणा व अघोरी विधी करत असलेल्या दोन संशयितांना गावकऱ्यांनी रंगेहात पकडून चोप दिला, आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गावकरी रात्री स्मशानाजवळून जात असताना त्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्या. आवाज ऐकून काही लोकांनी एकत्र येऊन स्मशानात धाव घेतली आणि तिथे काय चाललं होतं हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

दोन इसम तिथे अघोरी साहित्य घेऊन विधी करत होते. त्यांच्या जवळ नारळ, लिंबू, काळे कोंबडे, राख, काही देवी-देवतांचे फोटो, आणि काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी किंवा कोणी धनदौलत मिळवण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. गावकऱ्यांनी दोघांना पकडून झाडाला बांधलं आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या हवाली करण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT