Ramesh Jadhav News Today Saam TV News
Video

Kalyan Lok Sabha: कल्याणमध्ये नवा ट्विस्ट! रमेश जाधव यांच्या उमेदवारीमागे ठाकरेंची राजकीय खेळी की आणखी काही?

Maharashtra Election News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

Saam TV News

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातून मोठी राजकीय घडामोड समोर आलीय. कल्याणमधून ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कल्याणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना कल्याणमधून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता रमेश जाधव यांनीही अर्ज भरल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे ६ तारखेला नेमका उमेदवारी अर्ज कुणाचा मागे घेतला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं कल्याण लोकसभेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वैशाली दरेकर असा सामना होतो की रमेश जाधवही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास तिरंगी लढत होते की मग दरेकर आणि जाधव यांच्यापैकी एक जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT