Kalyan-Dombivli Potholes  Saam Tv
Video

Kalyan-Dombivli : कल्याण-डोंबिवलीचे रस्ते खड्डेबंबाळ! अवस्था बघून रागाने लाल व्हाल!, VIDEO पाहा!

Kalyan-Dombivli Potholes: कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो. पण रस्त्यांवरील खड्डे काही कमी होताना दिसत नाही.

Priya More

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते खड्ड्यात गेल्याचे चित्र पाहायाल मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. कल्याण, डोंबिवलीमधील अनेक रस्ते काँक्रीटचे झाले. डांबरी रस्त्यावर मात्र खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो. खड्डे भरण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. मात्र अवघ्या महिनाभरात कल्याण-डोंबिवली महापालिकाअंतर्गत असलेल्या डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. खड्ड्यामध्ये खडी टाकून केडीएमसीकडून खड्डे बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो. मात्र पावसात पुन्हा खडी बाहेर निघून खड्डे उघडे पडतात. त्यामुळे एकीकडे पाऊस दुसरीकडे खड्डे त्यामुळे वाहनचालक त्रस्त झालेत. या खड्डयांवर केडीएमसीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT