Kalyan-Dombivli residents face pothole-ridden roads; Congress announces ₹5,000 reward for finding a smooth stretch Saam Tv
Video

बिनखड्ड्याचा रस्ता शोधणाऱ्याला आता मिळणार 5 हजार रुपये|VIDEO

Congress Leader Launches Unique Contest: कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे. विना खड्ड्याचा ५०० मीटर रस्ता दाखवणाऱ्याला ५ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.

Omkar Sonawane

  • कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांवर काँग्रेसने अनोखी स्पर्धा जाहीर केली.

  • विना खड्ड्याचा ५०० मीटर रस्ता दाखवणाऱ्याला ५ हजार रुपये बक्षीस.

  • गणेशोत्सव तोंडावर असूनही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे.

  • केडीएमसीवर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांचा तीव्र शब्दांत आरोप.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी अनोखी स्पर्धा जाहीर करत बिना खड्ड्यांचा रस्ता दाखवणाऱ्याला 5 हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर टीकास्त्र सोडले आहे

गणेशोत्सव तोंडावर येऊनही अद्याप कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे परिस्थितीत आहेत. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव हा लोकांच्या भावनांशी जडलेला सण सुरू होत आहे. या परिस्थितीत खड्ड्यांमधून श्री गणरायाचे आगमन झाले तर श्री गणेशमूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असे झाले तर गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जातील अशी भावना जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

तसेच येत्या ३/४ दिवसात संपूर्ण कल्याण शहरातील छोटे-मोठे आणि मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केडीएमसी आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या वतीने “ ५०० मीटरचा विना खड्ड्याचा रस्ता दाखवा आणि रोख ५०००/- रुपयांचे बक्षीस मिळवा “ अशा प्रकारची स्पर्धा पालिकेच्या आवारात घेण्यात येईल आणि याचे जे ही परिणाम होतील त्याकरिता तुम्ही स्वतः जबाबदार असाल असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडली टोल नाक्यावरील शेकडो वाहने

Dream 11 गेमिंग ॲपची सेवा बंद! ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; VIDEO

PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

राजकारणाला हादरा देणारी घटना, एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय कक्ष प्रमुखावर रक्तरंजित हल्ला, घटनेनं खळबळ|VIDEO

Success Story : शिलाई मशीन आणि पंखे विकणाऱ्या सामान्य मुलाने उभी केली ₹७,००० कोटींची कंपनी, जाणून घ्या नानू गुप्ता यांचा प्रेरणादायी प्रवास...

SCROLL FOR NEXT