Scene outside the Kalyan clinic where the brutal assault on a Marathi receptionist by Gopal Jha took place. Saam Tv
Video

Kalyan News: आधी पोटावर लाथ मारली, केस धरून ओढत नेलं, परप्रांतीय तरुणाकडून मराठी तरुणीला अमानुष मारहाण| VIDEO

Migrant Youth Assaults Marathi girl: कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरातील एका बाल चिकित्सालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय गोपाल झा याने केस पकडून ओढत मारहाण केली.

Omkar Sonawane

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात एका बाल चिकित्सालयातील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला डॉक्टराना भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सदर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल झा या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पूर्वेतील एका लहान मुलाच्या क्लिनिक मध्ये सदर तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास क्लिनिक मधील डॉक्टराच्या केबिनमध्ये एम आर बसल्याने थोडा वेळ रुग्णांना आत पाठवू नको अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या. यामुळेच डॉक्टराना भेटण्यासाठी आलेल्या गोपाळ झा या तरुणाला इतर रूग्णा प्रमाणेच या तरुणीने थोडा वेळ थांबण्यास सांगितले.

मात्र तरीही तो ऐकत नसल्याने रिसेप्शनिस्ट तरुणीने आपल्या खुर्चीतून बाहेर येत या तरुणाला आत जाण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करताच संतापलेल्या गोपाळ याने धावत येऊन या तरुणीला केसांना धरून बेदम मारहाण केली यामुळे या तरुणीच्या अंगावरील कपडे फाटले. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या या तरुणीने गोकुळ विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दिली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गोकुळ झा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Butter Chicken Recipe: गटारीनिमित्त घरीच बनवा 'बटर चिकन' ; वाचा ही रेसिपी

Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'नं लावलं वेड; अहान पांडेच्या पहिल्याच चित्रपटाची हवा, सलमान-अक्षयला दिली टक्कर

Maharashtra Live News Update: पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; अंधेरी सबवे पाण्याखाली

Airtel Offer: एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज! १७००० रुपयांचे सबस्क्रिप्शन मिळणार फ्री

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंवर कुरघोडी, नगरविकास'च्या उधळपट्टीला चाप? मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT