K P Patil SaamTv
Video

K. P. Patil News : के. पी. पाटीलांनी हाती घेतली मशाल; मातोश्रीवर पक्षप्रवेश

K. P. Patil Join Shivsena UBT Group : माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

Saam Tv

माजी आमदार के. पी. पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. आज मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा गटात पक्ष प्रवेश केला आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी पक्षांतर करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे के. पी. पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात लढत देतील अशी चिन्हे आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांच्यामध्ये चांगली चुरस निर्माण झाली होती. दोघांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, पक्ष मात्र निश्चित झालेला नव्हता. आता के. पी. पाटील यांनी मशाल हहाटी घेतल्यानंतर ए. वाय. पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT