VIDEO: महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप! Jitendra Awhad यांनी मुर्तीकाराचा आशय केला ट्विट  Saam TV
Video

VIDEO: महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप! Jitendra Awhad यांनी मुर्तीकाराचा आशय केला ट्विट

Jitendra Awhad Tweet News: महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट, मुर्तीकाराने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार केलं ट्विट.

Uday Satam

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. आणि अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने चर्चा रंगल्याची पाहायला मिळत आहे. मूर्तीकाराने एका मुलाखतीत दिलेल्या माहिती नुसार आव्हाडांनी हे ट्विट केलंय "नौदल अधिका-यांच्या सूचनांनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले" छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तीकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे. ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर कामाच्या दर्जा काय असेल, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही. जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे. ज्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभर ताठ मानेने हिंडतो आज त्याच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पापाला कुठलंही प्रायश्चित नाही. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT