Jharkhand News Holi Procession Violence ANI
Video

Holi Procession: होळीच्या मिरवणुकीला विरोध, दोन समाजात उफळला हिंसाचार; दुकाने जाळली

Jharkhand News Holi Procession Violence: होळी सणादरम्यान हिंसाचाराची घटना घडलीय. होळीच्या मिरवणुकीला विरोध केल्यानंतर दोन गटात वाद उफाळून आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाल्याची घटना घडलीय. होळीच्या सेलिब्रेशनवेळी दोन समजांमध्ये हिंसाचार उफळला. यात अनेक लोक जखमी झाले असून तीन दुकाने काही पेटवून दिली आहेत. या हिंसाचारानंतर पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय.

दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. घोडाथांबा येथून जात असलेल्या होळीच्या मिरवणुकीला एका समाजाने विरोध केला. यानंतर येथे दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. काही वाहनांना आग लावण्यात आली. अशीच एक हिंसाचाराची घटना ओपी परिसरात घडली. येथली दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली.

ही घटना होळीच्या उत्सवादरम्यान घडली. आम्ही दोन्ही समुदायांची ओळख पटवत आहोत. घटनेत सहभागी असलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. ओळख पटल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही मोठी दुखापत झालेली नसल्याची माहिती एसपी डॉ. बिमल यांनी दिलीय. होळीच्या उत्सवादरम्यान काही समाजकंटकांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याचं उपविकास आयुक्त स्मिता कुमारी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT