Jaydeep Apte News saam Tv News
Video

Video: जयदीप आपटेला काल कल्याणमधून अटक

पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. आपटेला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले.

Rachana Bhondave

सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यापासून जयदीप आपटे हा पसार होता . सिंधुदुर्ग पोलिसांसह कल्याणचे पोलीस देखील त्याच्या मागावर होते त्याच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. बाजारपेठ पोलिसांना आपटे हा त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याणमधील बाजारपेठे येथील घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कल्याण पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन व जयदीप आपटे यांच्या बाजारपेठ परिसरातील घराच्या परिसरात सापळा रचला होता. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे. आपटेला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक कल्याण डीसीपी कार्यालयात दाखल झाले त्यांनी जयदीप आपटेला ताब्यात घेत सिंधुदुर्गच्या दिशेने ते रवाना झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT