Jogeshwari’s Jai Jawan Govinda Pathak practicing for the historic 10-tier Dahi Handi pyramid in Mumbai. Saam Tv
Video

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Jai Jawan Govinda Pathak: मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथक यंदा दहा थरांचा मानवी मनोरा रचून नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या पथकाने नऊ थरांचा विक्रम केला होता.

Omkar Sonawane

मुंबई :जय जवान गोविंदा पथक यंदा दहाव्या थराचा मान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहे. यापूर्वी या पथकानेच 2012 साली नऊ थरांचा विक्रम रचला होता. त्यानंतर स्वतःचाच विक्रम मोडीत काढत जय जवान पथकाने साडेनऊ थर रचत इतिहास घडवला होता.

गोविंदा पथकांमध्ये जय जवान पथकाचं नाव नेहमीच पुढे राहिलं आहे. थर रचण्यातल्या कौशल्यामुळे आणि संघटित प्रयत्नांमुळे या पथकाला ओळख मिळाली आहे. यंदाही दहा थर रचण्याचा संकल्प करून जय जवान पथकाने गोविंदा उत्सवात थरार निर्माण करण्याची तयारी केली आहे. मागील दीड महिन्यांपासून पथकांचा सराव सुरू होता. सध्या सहा, सात आणि आठ, नऊ थरांसाठी अधिक बक्षिसे असल्याने गोविंदा पथकांचा सहापेक्षा अधिक थर रचण्याकडे आहे.

जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वीच सर्वाधिक उंच रचण्याचा विक्रम केला असून गेल्या काही वर्षांपासून हे पथक आपला हा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT