भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
इराणने इस्त्राईलवर डागलेले बॅलेस्टिक मिसाईल हल्ले केलेत. मात्र इस्त्राईल लेबनानमधील हल्ले कमी करण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता संतापलेल्या इस्त्राईलच्या आयडीएफ सैन्य दलाने थेट इराणवर कोणत्याही क्षणी विध्वंसक हल्ला करण्याचा इशाराच दिलाय. दुसरीकडे इस्त्राईलने आजूबाजूच्या अनेक मुस्लीम राष्ट्रांना अंगार घेतलंय. त्यांच्यावर जोरदार विध्वंसक हल्ले सुरु केले आहेत.
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्त्राईलमध्ये विध्वंसक हल्ले केले. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय..मात्र वर्षभरात पश्चिम आशिया युद्धाने कसा होरपळला आहे? ते जाणून घेऊ...
7 ऑक्टोबर 2023 ला हमासचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला केला. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अपघाताला इस्त्राईल जबाबदार असल्याचा इराणचा आरोप आहे. 27 सप्टेंबर 2024ला हिजबोल्लाचा प्रमुख हसन नसरुल्लाची हत्या केली. 1 ऑक्टोबरला इराणचे इस्त्राईलवर मिसाईल हल्ले केले. इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलची IFD सज्ज आहे. इराणमध्ये विध्वंस घडवण्यासाठी हल्ले करण्याची तयारी केली आहे.
इस्त्राईलचे अध्यक्ष बेझांमिन नेत्यान्याहूंनी इराणला बेचिराख करण्याचा इशाराच इराणचे राष्ट्राध्यक्ष अल खेमेनींना दिलाय...त्यामुळे इस्त्राईल इराणच्या तेल भांडार आणि अणुभट्ट्यांवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाच्या आगीची झळ पेट्रोल डिझेलच्या किमती वाढून भारतालाही बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.