मावळ: इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांना या कुंडमळा धबधब्यावर न येण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.परंतु पर्यटक या फकलाकडे दुर्लक्ष करत आहेत.पुणेकर या कुंडमळा धबधब्याला खास पसंती देत आहेत,त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडकर पर्यटक देखील येथे भेट देत आहेत. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांनी त्यांचा इथे जीव गमावला आहे. तरीही जीव धोक्यात घालून पर्यटक इथे येत आहेत.त्यामुळे पोलिस डोळ्यात तेल घालून इथे सुरक्षा देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.