IndiGo Saam Tv
Video

IndiGo : इंडिगोच्या घोळाचा नेत्यांना फटका, नागपूरला जाणाऱ्या आमदारांची तिकिटे रद्द

IndiGo Latest News :इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदार आणि मंत्र्यांचे तिकिटे ऐनवेळी रद्द झाली. मुंबई आणि पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या उड्डाणांमध्ये वारंवार विलंब आणि रद्दीकरणामुळे नेत्यांना ट्रेन किंवा रोडमार्गाचा पर्याय स्वीकारावा लागला आहे.

Namdeo Kumbhar

इंडिगोच्या घोळाचा आमदारांनाही फटका बसला आहे. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालीत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालीत. त्यामुळे आता कारनं नागपुरात जाण्याची वेळ आमदारांवर आलीय. उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला इंडिगोचा फटका बसलेला आहे. मुंबई - नागपूर आणि पुणे - नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर उड्डाणे वारंवार रद्द झाल्याने आणि तासंतास होत आहे. त्यामुळे या विलंबामुळे प्रवाशांसोबत आता मंत्री, आमदार अधिकारी यांनासुद्धा यांच्या परिणाम जाणवत आहे.

अधिवेशनासाठी उपराजधानी आज पोहोचणे आवश्यक होते, त्या अनुषंगाने या दोन दिवसात अनेक मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होण्याची नियोजन होते. मात्र मुंबई आणि पुण्याहून येणारी विमाने ऐनवेळी रद्द झाल्याने आता मंत्री ,आमदार, अधिकाऱ्यांनी ट्रेनच्या आसरा घ्यावा लागला आहे. अनेक आमदार मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT