Maharashtra Congress chief Harshvardhan Sapkal  saam tv
Video

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Baramati And Rahuri Bypolls: बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. या निवडणुकीच्या रिंगणात आता काँग्रेस देखील उतरणार आहे. या दोन्ही ठिकाणची निवडणूक काँग्रेस लढणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Priya More

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध होणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता इतर राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरूवात केली आहे. राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. दुसरीकडे दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत. त्यामुळे काँग्रेसशी चर्चा करू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी मात्र चर्चा करुन निर्णय घेऊ अशी सावध भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT