India cancels Indus Water Treaty with Pakistan saam tv
Video

Major CCS Decisions: पाकिस्तानवर येणार उपासमारीची वेळ, भारताने बंद केले सिंधुधरणाचं पाणी, अजून घेतले महत्वाचे 5 निर्णय|VIDEO

Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहे. विदेश सचिव विक्रम मिस्री यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पोलीस वेशात येऊन भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत गोळ्या झाडल्या. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतीच देण्यात आली आहे. यानंतर आता पंतप्रधान यांच्या सोबत सर्वदलाचे प्रमुख आणि गृहमंत्री आमित शहा तसेच परराष्ट्र मंत्र्यांची अडीच तास बैठक चालली या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असून पाकिस्तानला कायदेशीर दणका दिला आहे.

सिंधु जल करार थांबण्यात आला आहे, ज्यामध्ये भारताकडून पाकिस्तानला पाणी दिले जायचे आता ते थांबवले आहे. तसेच अटारी बॉर्डर येथून मालाची देवाण घेवाण केली जायची ती आता थांबण्यात आली आहे.

पाकिस्तानी लोकांना भारताचा दिलेला विजा हा देखील रद्द केला असून पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि पाकिस्तानच्या सर्व सैन्य सल्लागारांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगितले आहे. भारत देखील आपल्या सल्लागाराना परत बोलावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT