Bangladesh Violence Saam Tv
Video

Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकले, VIDEO

India Bangladesh Border Sealed Onion Export Issue: बांगलादेशमधील हिंसाचार वाढत असल्यामुळे भारत-बांग्लादेश सीमा सील करण्यात आलीय. त्यामुळे शेकडो ट्रक बॉर्डरवर अडकले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका भारतातील कांदा निर्यातीला बसला आहे. नाशिकमधून रोज ५० ते ६० ट्रक कांदा बांगलादेशला निर्यात होतो. बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने सीमा सील केलीय. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याची निर्यातीसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.

मात्र, सीमा सील झाल्यानं शेकडो कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतमालांच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT