Independence Day 2024  Saam Tv
Video

Independence Day 2024 : २१ तोफांची सलामी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा नेत्रदीपक सोहळा, VIDEO

PM Modi Flag Hosting On Lal Kila Video : सलग अकराव्यांदा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर पीएम मोदींनी ध्वजारोहण केलंय. लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा व्हिडिओ समोर आलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : आज संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग अकराव्या वेळेस लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समारंभ पार पडला आहे. ध्वजारोहण समारंभाची डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज लाल किल्ल्यावर भव्य सोहळा संपन्न झालाय. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलाय.

स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातोय. लाल किल्ल्यावर फील्ड गनमधून २१ तोफांची सलामी ध्वजारोहणावेळी देण्यात आली. पीएम मोदी ध्वज फडकवण्यासाठी तटबंदीच्या दिशेने गेले तेव्हा स्वदेशी १०५ मिमी लाइट फील्ड गन वापरून २१ तोफांची सलामी दिली गेलीय. हा अभिमानाचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा क्षण होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होताच स्वदेशी हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे ट्रिप प्लान करा

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

SCROLL FOR NEXT