Ladaki bahin yojana  Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: दारुसाठी पैसे दे! लाडकी बहिणीच्या पैशांवरून वाद, पतीचा पारा चढला, कोयता उचलला अन्...VIDEO

Domestic Violence: राज्यामध्ये महिलांच्या सबलीकरनासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही आता त्याच्या बेतत आहे की काय असा प्रश्न झाला निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यामध्ये महिलांच्या सबलीकरनासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही आता त्याच्या बेतत आहे की काय असा प्रश्न झाला निर्माण झाला आहे. कारण लाडकी बहीण योजनेमार्फत मिळालेल्या पैशांवरून घरात वाद व्हायला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे.पत्नीला मिळालेल्या योजेनच्या पैशांवर तिच्या दारुड्या पतीनेच डल्ला मारला आणि तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. निशा धनाजी लोंढे या महिलेचे नाव आहे.होळीच्या दिवशी आणि महिला दिनाला सर्व तिच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आणि तिने पैशाचे नियोजन सुरू केले मात्र त्याच वेळी तिचा बेवडा नवरा हा तिच्याकडे दारू ढोसण्यासाठी पैसे मागू लागला. तिने नकार दिल्यानंतर त्याने थेट तिच्यावर कोयत्याने हल्ला चढवला यामध्ये ती आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या गुन्ह्यामध्ये तिच्या सासूचा देखील समावेश आहे.पीडित महिलेने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र सासरच्या दबावानंतर पीडित महिलेने सारवासारव केली अशी चर्चा आता गावात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT