Nandgaon News SaamTv
Video

Nandgaon Constituency News : नांदगावात भुजबळ - बोरसे समर्थकांत बाचाबाची; वातावरण तपलं |VIDEO

Bhujbal - Borse Dispute : नांदगावच्या साकोरा गावात भुजबळ आणि बोरसे समर्थक पुन्हा एकदा भिडले आहेत. पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून हा राडा झाला आहे.

Saam Tv

नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात पुन्हा एकदा बोरसे आणि भुजबळ समर्थकांत हा राडा झाला आहे. यावेळी भुजबळ समर्थकाची कार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भुजबळ समर्थकांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप देखील बोरसे समर्थकांकडून करण्यात आला आहे. याच कारणावरून भुजबळ आणि बोरसे यांच्या समर्थकांत बाचाबाची झाली आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावात हा सगळा राडा झाला आहे. या ठिकाणी भुजबळ यांचे समर्थक एका गाडीतून आले. त्यावेळी त्यांच्याकडून मतदारांना पैसे वाटप केलं जात आहे, असा संशय बोरसे यांच्या समर्थकांना आला. त्यानंतर त्यांनी या भुजबळ समर्थकांची गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांत बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जमाव पांगवत भुजबळ समर्थकांना आणि गाडीला ताब्यात घेतलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT