hingoli news  Saam Tv
Video

Hingoli Crime: जुन्या गुन्ह्याची तक्रार मागे न घेतल्याचा राग; ६ जणांच्या टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला | VIDEO

Hingoli Youth Stabbed By Gang: हिंगोली शहरातील जवाहर रोड परिसरात सहा जणांच्या टोळक्याने विनोद बेंगाळ या तरुणावर चाकू हल्ला केला. जुना गुन्हा मागे न घेतल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला. सीसीटीव्हीत घटनेचा थरार कैद झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून, दररोज कुठे न कुठे हल्ल्याच्या घटना घडत आहेत. हिंगोली शहरातही भयंकर घटना घडली आहे. शहरात सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला केला आहे. जवाहर रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेत चाकूहल्ला झालेल्या तरुणाचे नाव विनोद बेंगाळ असे आहे. आरोपींनी या तरुणावर पूर्वीच्या गुन्ह्यातील तक्रार मागे न घेतल्याच्या कारणावरून हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. यातील काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात पावसाला सुरुवात

Bihar Election: ऐनवेळी पक्षानं तिकीट नाकारलं, भाजप नेता ढसाढसा रडला; आत्मदहनाचा प्रयत्न करत...; VIDEO व्हायरल

Milk Price Increase: शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! दूध खरेदी दरात तब्बल इतक्या रुपयांची वाढ|VIDEO

Kolhapur: ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्...; कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर घडलं

Cultural Department Bonus: 'चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सरकारकडून इतका बोनस जाहीर

SCROLL FOR NEXT