Sanjeev Kumar Saam TV
Video

Scooter Fancy Number : 1 लाखाची स्कूटी आणि 14 लाखांचा नंबर, हौसेला मोल नाही | VIDEO

Himachal Pradesh : केवळ १ लाखांची स्कूटी, पण खास नंबरसाठी १४ लाखांची बोली लावली. संजीव कुमार यांचा भन्नाट छंद चर्चेचा विषय ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छंदासाठी माणूस किती पुढे जातो याचं उदाहरण म्हणजे हिमाचल प्रदेशातील संजीव कुमार. त्यांनी केवळ १ लाख रुपयांची स्कूटी खरेदी केली असून, मात्र तिच्यासाठी तब्बल १४ लाख रुपयांचा व्हिआयपी नंबर विकत घेतला आहे.

HP21C-0001 हा खास नंबर मिळवण्यासाठी परिवहन विभागाने लिलावाचं आयोजन केलं होतं. या लिलावात फक्त दोनच स्पर्धक होते. सोलन जिल्ह्यातील दुसऱ्या स्पर्धकाने १३.५ लाख रुपये इतकी मोठी बोली लावली, परंतु संजीव कुमार यांनी त्यावर मात करत १४ लाखांची अंतिम बोली लावून ‘0001’ नंबर आपल्या नावावर केला.

हा क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी स्कूटीच्या किंमतीपेक्षा १४ पट अधिक रक्कम खर्च केली आहे. त्यांच्या या हटके निर्णयामुळे संजीव कुमार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या या ‘नंबर प्रेमाला’ अनेकजण आश्चर्याने आणि कौतुकाने पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT