Devotees wait at Girgaon Chowpatty as Lalbaugcha Raja’s immersion is delayed due to high tide and technical issues. Saam Tv
Video

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

Immersion of Lalbaugcha Raja: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनात भरतीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. जड पाट, नवीन तराफा आणि हायड्रोलिक यंत्रणेत अडचणींमुळे विसर्जन तब्बल २४ तासांपासून रखडले आहे.

Omkar Sonawane

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल 24 तासांचा विलंब झाला आहे.

समुद्राला भरती आल्यामुळे नवीन तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी येत आहेत.

हायड्रोलिक यंत्रणा आणि जड पाट यामुळे विसर्जन रखडलं आहे.

गिरगाव चौपाटीवर भाविक विसर्जनासाठी मोठ्या उत्साहाने थांबले आहेत.

ही शान कुणाची लालबागच्या राजाची! लालबागचा राजा प्रस्थान करून तब्बल 24 तास उलटले असून अद्यापही लालबागचा राजाचे विसर्जन झालेले नाहीये. सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. मात्र अजूनही लालबागच्या राजाच विसर्जन झालेले नाहीये. विसर्जन न होण्याच कारण म्हणजे, लालबागच्या राजाचा पाट जड झाला आहे. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचे विसर्जन रखडले आहे. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे. समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही लालबागचा राजा तराफ्यावर चढलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीची २ वाजता आज पत्रकार परिषद

Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेटच्या किंमती

Navratri fasting rules: नवरात्रीच्या उपवासात काय खावं आणि काय टाळावं? देवीच्या पूजेपासून आहारापर्यंत प्रत्येक नियम जाणून घ्या

Navratri 2026 : नवरात्रीचे ९ दिवस, ९ देवी अन् ९ खास नैवेद्य; पाहा कोणत्या दिवशी काय प्रसाद दाखवावा

SCROLL FOR NEXT