Pune Accident Saam Tv
Video

Accident: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Pune Accident CCTV: पुणे-अहिल्यानगर महामार्गावर गुरूवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पुण्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तरुण दुचाकीसह महामार्गाच्या विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन कोसळला. यावेळी समोरून आलेल्या कारने या दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातानंतर कारचालक फरार झाला.

या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शरद वाघ असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या शिक्रापूर पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. शरद वाघ यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. शिकरापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT