Mumbai Traffic Saam Tv
Video

Mumbai Traffic: मुंबईत रात्रीपासून कोसळधार, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा| VIDEO

Mumbai Rainfall: मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Priya More

मुंबईत रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या परिसरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय. कामावर जाण्यासाठी मुंबईकरांना उशिर होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून राहिल्यामुळे मुंबईकरांना आज ऑफिसमध्ये लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. विलेपार्ले ते मालाडचा अर्धा तासाचा प्रवास तब्बल अडीच तासांत पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. ट्राफिक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT