Ratnagiri Rain Saam TV
Video

Ratnagiri Rain News : रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती नियंत्रणात|VIDEO

Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासात ६८.६८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ६८.६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, गुहागर आणि खेड या तालुक्यांमध्ये ९० मिमीहून अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे.

रत्नागिरीतल्या जिल्ह्यांचा नद्यांचा जर विचार केला तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे. राजापूर मधील कोदावली नदी ही इशारा पातळीवर वाहते आहे. त्याचबरोबर खेडमधील जगबुडी नदी देखील इशारा पातळीवर वाहते आहे.पावसाची संतधार थांबली असली तरी काही सखल भागांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. दरम्यान, हवामान विभागाने आजही रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहिर केला आहे. आजही मुसळधार पाऊस पडेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अवाहन प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT