Nanded Rain | किनवट तालुक्यातील एका गावातील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात शेतकरी अडकला होता. या शेतकऱ्याला वाचवण्यात आले.  SAAM TV
Video

Nanded Flood : पुराच्या पाण्यात अडकला शेतकरी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Nanded Flood News : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अप्पारावपेठ येथील नाल्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात वृद्ध शेतकरी अडकला होता. रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ बघा!

Saam TV News

नांदेड : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसानं झोडपलं. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील काही गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्यानंतर तिथं पुराचं पाणी काही घरांमध्ये शिरलं होतं. आता नांदेडमध्येही मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यातील काही भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. नांदेडच्या किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील अप्पारावपेठ येथील नाल्याला पूर आला होता. यामध्ये एक वयोवृद्ध शेतकरी अडकला होता. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. येथील काही शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोराच्या साह्याने या शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलं. तर याच ठिकाणी आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT